घरात बसून काय करता?; शरद पवार म्हणाले...

करोना व्हायरस'च्या साथीमुळं देशभरात संचारबंदी असून लोकांना घरातच राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. घरातून बसून आपण काय करतो, हेही पवारांनी जनतेला सांगितलं आहे.


पुस्तक वाचतानाचा स्वत:चा एक फोटोच शरद पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 'चला करोनाशी लढूया' असं आवाहन त्यांनी फोटोच्या माध्यमातून केलं आहे. घरात बसून काय करायचं असं प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शक्य आहे ती मंडळी घरात बसून कार्यालयीन कामं करत आहेत. मात्र, ज्यांना ती सोय नाही, त्यांच्यापुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. एकमेकांना फोन करून लोक वेळ घालवण्याच्या टिप्स घेत आहेत.