थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंकुश पिनाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विठ्ठल मोरे, मारोती पुरणवाढ, सुरेश पुंड, डहाळे, साहेबराव धोत्रे, पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
परभणी : येथील भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांची सलग चौथ्यांदा तालुक्यातील आसोला येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी गोकुळा पुरभाजी जावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह सदस्य सुभाष जावळे, अनुसया जावळे, प्रल्हाद भरोसे, अनंत जावळे, दादाराव भरोसे, अमृत जावळे, चांदु भंगे, रामराव गिणगिणे, आबा पारडे, संतोबा जावळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अंकुशराव आवरगंड, दादाराव जावळे, पुरभाजी जावळे, बाळासाहेब जावळे, रंगनाथ भरोसे, राजाराम भरोसे, नारायण जावळे, बाळासाहेब भरोसे, उद्धव जावळे, व्यंकटी जावळे आदी यावेळी उपस्थितीत होते.